राज्यात भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या वतीने सावरकर गाैरव यात्रा सुरू झाल्या असतानाच वेदाेक्त प्रकरणाचा वाद सुरू झाला आहे. संभाजी ब्रिगेडने हा विषय हाती घेतला आहे. पण मुळात हा प्रकार घडल्यानंतर दीड महिन्यांनी त्यावर चर्चा सुरू हाेण्याचे कारणच काय? सावरकर गाैरव यात्रा, नाशिक लाेकसभा निवडणुकीचे गणित ही कारणे तर त्यामागे नाहीत ना अशा शंका व्यक्त हाेऊ लागल्या आहेत.10 फेब्रुवारी 2023 : छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी सौ. संयोगिता राजे यांनी काळा रामाला अभिषेक आणि तुलसी अर्चनाचा संकल्प केला. महंत सुधीरदास पुजारी यांनी याबाबत ट्विटही केले हाेते. संयाेगिताराजे यांच्यासाेबतचे फाेटाेही शेअर केले.
11 फेब्रुवारी 2023 : दुसऱ्या दिवशी संकल्पानुसार पूजा केली. 30 मार्च 2023 : संयोगिता राजे यांनी सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहिली. इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की,नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पुजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.
31 मार्च 2023 : मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिलगिरी व्यक्त करून खुलासा केला. पुराणोक्त शब्दामुळे राणीसाहेबांचा गैरसमज झाल्याचे त्यांनी नमूद केले.
1 एप्रिल 2023 :
- विविध संघटनांच्या ग्रुपवर तसेच साेशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा तापविण्यास सुरूवात. संभाजी ब्रिगेड आक्रमक.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यघटनेची प्रत श्रीरामाच्या चरणी ठेवत घेतले दर्शन. - दीड महिन्यानंतर तक्रार देण्यामागचे कारण काय? याबाबत चर्चा सुरू.
- संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद. वेदोक्त प्रकरणावर दीड महिन्यांनी बोलल्या म्हणजे त्या विचार करून बोलल्या आहेत. त्यावेळी माझा वाढदिवस होता म्हणून बोलल्या नाहीत, असा केला खुलासा. असे कृत्य करणारे लोक निर्माण होऊ नयेत. महंतांनी मोठ्या महाराजांना भेटले पाहिजे. छत्रपती घराण्यातील स्त्रीला अवमानकारक बोललं गेलं, वागणूक दिली गेली. आजच्या घडीला देखील हे का घडतंय? हे सरकारने पहायला पाहिजे.
हा सगळा घटनाक्रम पाहिल्यावर यात काहीतरी राजकारण असल्याचा संशय व्यक्त हाेत आहे. त्याला कारण महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा निषेध म्हणून तसचे सावरकर विचार महाराष्ट्रात घराेघरी पाेहाेचविण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या सावरकर गौरव यात्रा सुरू झाल्या आहेत. संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटना तसचे राज्यातील काही विशिष्ट वर्गाची सावरकरांविषयीची भूमिका सर्वश्रुत आहे. सावरकरांच्या विचारांचा प्रसार हाेणे विराेधकांना राजकीय दृष्टया परवडणारे नाही. मात्र, त्याला थेट विराेध करता येत नाही. त्यामुळे दुसरा एखादा मुद्दा काढण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? त्यामुळेच नाशिकमधील वेदाेक्त प्रकरणाला दीड महिन्यानंतर हवा मिळाली का? जितेंद्र आव्हाड, अमाेल मिटकरी यांच्यासारख्या नेत्यांनी यावरून भडकवाभडकवी सुरू केली आहे.आता प्रश्न उपस्थित हाेते संभाजीराजे यांनी हा विषय वाढविण्याचे कारण काय? त्यांची महाविकास आघाडीला मदत करण्याची इच्छा आहे का? तर नाही. त्यांच्यावर असा आराेप करणे याेग्य हाेणार नाही. पण त्यांचे स्वत:चे राजकारण आहे. त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
पण मग या प्रकरणाचा त्यांना फायदा काय? याचे कारण म्हणजे नाशिकमध्ये महाविकास आघाडी, शिवसेना- भाजप यांच्यासाेबत मनसेचीही ताकद आहे. शिवाय छगन भुजबळ यांच्या गेल्या काही वर्षांतील राजकारणामुळे जातीय ध्रुवीकरण झाले आहे. अस्मितांच्या राजकारणाला महत्व आले आहे. स्वराज्य सारख्या नव्या पक्षाला या सगळ्या मतविभागणीचा आणि अस्मितांचा फायदा हाेऊ शकताे. वेदाेक्त प्रकरण काढून छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा आपणच चालताेय हा नॅरेटिव्हही त्यांना कायम करता आला तर बहुजन मते त्यांच्याकडे जाऊ शकतात.हे सगळे राजकारण झाले, पण त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा जातीय अस्मितेच्या मुद्यावर जाऊ पाहतेय काय, अशी भीती तर निश्चित आहे.
