‘द फॅमिली मॅन 3’ ची प्रतीक्षा संपली; नवीन सीजन येणार असल्याची स्वतः मनोज वायपेयीने दिली माहिती

‘द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीनेहमी चर्चेत असतो. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मनोजच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून चाहते या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. नुकतच एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाला,”2023 च्या शेवटी ‘द फॅमिली मॅन’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे”.

नुकतेच, मनोज बाजपेयी यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला जेथे त्यांनी द फॅमिली मॅन 3 बद्दल सांगितले. मनोजला सीझन 3 च्या शक्यतेबद्दल विचारले गेले आणि त्याने सा्ंगितले . या सिरीजमधल्या स्वतःच्या स्टाईलमध्ये , मनोज म्हणाला, “आज सकाळी एक पक्षी उडून माझ्या खिडकीवर बसला आणि आम्ही म्हणालो की कदाचित आपण या वर्षाच्या शेवटी शूट करू शकू आणि जर पैसे वाचवून सर्व काही ठीक झाले तर. आम्ही करू.”

पहिल्या भागात तो दहशतवाद्यांशी लढला, तर दुसऱ्या सत्रात दक्षिण भारतीय डिवा समंथा रुथ प्रभूशी लढताना दिसला. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागात शेवटी श्रीकांत कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे, अशी हिंट देण्यात आली होती. ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.