उद्धव ठाकरेंसोबत राहिलेला कट्टर शिवसैनिक का आहे अस्वस्थ!

मुंबई : दसरा मेळाव्यापासून सुरू झालेली मुस्लिम अनुनयाची उद्धव ठाकरे यांची भूमिका छत्रपती संभाजीनगरच्या सभेतही कायम राहिली. त्यामुळे अजूनही ठाकरे गटाकडे राहिलेला उर्वरित शिवसैनिक भांबवलेला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा त्याला मान्य नव्हता. नबाब मलिक, असलम शेख त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे पाहिले की त्याचा संताप व्हायचा.

शिवसेनेत फूट पडली. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. मात्र ठाकरे नावाला जागून काही जण उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहील. पण याच शिवसैनिकाला आता कळत नाहीये की हिंदुत्व सोडलं नाही म्हणताना मुस्लिमांना पाणी लावण्याची उद्धव ठाकरे यांना गरज का वाटतेय त्यांना कळेनाय.

कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पोसलेला आहे. तो विचार आहे ज्वलंत हिंदुत्वाचा. या हिंदुत्वाला मुस्लिमविरोधाची किनार होती. बाळासाहेबांची मुस्लिमांबाबतची वक्तव्यं वादग्रस्त, प्रक्षोभक असली तरी त्यांनी पर्वा केली नाही. त्यांची आक्रमकता भिनलेल्या शिवसैनिकांमध्ये ती भूमिकाही उतरली. त्यामुळे मुस्लिमविरोध आणि शिवसेना हे समीकरण होते आणि शिवसैनिकांच्या मनात आजही आहे.

शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर 1987 साली मुंबईत विलेपार्ल्याची पोटनिवडणूक लढविली होती. या निवडणुकीत बाळासाहेबांनी आपली भूमिका जाहीर सभांमधून मांडली होती.ते म्हणायचे, आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाहीये. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार.

याच वक्तव्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने बाळासाहेब आणि निवडून आलेले आमदार रमेश प्रभू दोघांनाही दोषी ठरवले. निकाल रद्द केला. 1995 मध्ये सुप्रीम कोर्टानंही हा निकाल कायम ठेवला. शिक्षा म्हणून 1995 ते 2001 पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. मात्र त्यांनी त्याची पर्वा केली नाही.

बाळासाहेबांचा, शिवसेनेचा हा जाज्वल्य इतिहास असताना सध्या उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत मुस्लिम अनुयायाची भूमिका घेत आहेत. काश्मीर मधील शहीद औरंगजेब नावाच्या एका सैनिकाचा ताकत त्याने उल्लेख करत आहेत.

शहिदांचा अभिमान प्रत्येकच भारतीयाला वाटतो. पण मुस्लिम अनुनयायामागची खेळी कट्टर शिवसैनिकाला पसंत नाही. शिवसेनेचे फूट पडल्यानंतर नाव आणि चिन्ह यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपले मतांचे राजकारण साधण्यासाठी मुस्लिम मतांची गरज वाटू लागली आहे.

भारतातील निवडणुकांचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील जो उमेदवार तगडा असेल त्यालाच मुस्लिम समाज स्ट्रॅटेजीकली मतदान करतो.

उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केला तरी पाच ते दहा टक्के पेक्षा जास्त मुस्लिम मते त्यांना मिळू शकणार नाहीत याची जमीनवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कडव्या शिवसैनिकाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच मतांचा कटोरा घेऊन जनाब उद्धव साहेब बनण्यास त्याचा विरोध आहे. कारण त्याला हवे आहे शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क ज्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेला ते हिंदुत्व.