अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेचा टीजर

शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार खासदार अयोध्या दौरा करणार, असं जाहीर करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी या दौऱ्याची तारीखही सांगण्यात आली. आज एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर जारी करण्यात आलाय. महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा, असे मुद्दे या टिझरवरून अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सोशल मीडियावर हा टिझल वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन असून राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे.

8 एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनऊमध्ये दाखल होतील. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे. 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जातील. त्यानंतर हनुमान गडी, लक्ष्मण किल्ला करून दुपारी पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईत परतील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील.

मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे हे पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, श्रद्धेचा विषय आहे. राजकारण म्हणून या विषयाकडे पाहणार नाही असेही ते म्हणाले होते.अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि पंतप्रधान मोदी ते पूर्ण करतायत. यात खारीचा वाटा म्हणून सागाची लाकडे आम्ही मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं.