भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी

पुणे : भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनाही 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. मंगळवारी (दि. 4) सायंकाळी अज्ञाताने मेसेज केला. त्यामध्ये 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती.

परिवर्तन हेल्पलाईनवर काम करणाऱ्या तरुणाने हा मेसेज रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बघितला. त्यामध्ये 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अशाच प्रकारची धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील आली होती. त्या प्रकरणात आरोपींनी आम्ही आठ जण असल्याचे सांगण्यात आले होते.