नागपूर : उद्धव ठाकरे, फडतूस नहीं, काडतूस हूं में, झुकेगा नहीं साला घुसेगा अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. ठाण्यात आज दुपारी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची फडतूस अशी संभावना केली होती. त्यावर फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी लांछन लावतात आणि त्याचवेळी आमच्याबरोबर वर्षानुवर्ष असलेले आमचे मित्र उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. त्या ठिकाणी सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात.
मला राहुल गांधीबद्दल बोलायचे नाही पण उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे ,अरे काय होतास तू, काय झालास तू ,असा कसा वाया गेलास तू. काँग्रेसचा एक नेता मणिशंकर अय्यर असाच स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणाला होता. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः जोडा घेऊन निघाले. त्यांनी मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता. सांगता ना त्यांचे नाव, म्हणताना आमच्या वडिलांना पळवलं. बघ वडिलांचे विचार केले कुठे? तुमच्या वडिलांचे विचार गेले कुठे? त्यांची कृती गेली कुठे? तुम्ही त्यांची कृती सोडून दिली म्हणून आम्हाला मैदानात उतरावे लागले. आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावे लागतेय. कारण वारसा जन्माने मिळत नाही वारसा कर्माने मिळत असतो.
तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुख्यपत्राने एक लेख छापला. त्यामध्ये म्हटले होते की स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर सावरकर यांनी बलात्कार केला होता. समलैंगिक होते. इतके भयानक लिहिले पण त्यांना खुर्चीची चिंता होती त्यामुळे साधा निषेधही केला नाही. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आणि यांचे बाळराजे ते जेव्हा महाराष्ट्रात आले, सावरकरांना शिव्या देत होते त्यावेळी त्यांच्या गळ्यात गळा घालून त्यांच्याबरोबर पायी फिरत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय,काय झालास तू
