मी बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन” असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी लोकसभा निवडणुकीला आपली दावेदारी सांगितली आहे.
बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.त्यामुळे आता बारामती मतदार संघ तृप्ती देसाई यांनी इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत आपल्याला आम आदमी पक्षाकडूनही ऑफर असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सुप्रिया सुळे पुन्हा या मतदारसंघात फिरत आहेत.त्यामुळे आगामी लोकसभेसाठीही त्याच उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे चांगले काम असल्याने आता भाजपलाही लोकांची पसंदी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देसाई म्हणाल्या की, आजच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं त्यांनी मला सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. असंही यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या
