“वॉर 2” मध्ये ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआरची एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या ‘वॉर 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनचा ‘वॉर’ हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या दुसऱ्या भागात ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआर झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे काम ‘वॉर 2’मुळे थांबवले आहे. अयान मुखर्जीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून लोकांना याची माहिती दिली होती.वॉर 2 या चित्रपटात अयान मुखर्जीची एन्ट्री झाल्यानंतर आता ज्युनियर एनटीआरही यात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. ज्युनियर एनटीआरला यशराजने वॉर 2 ऑफर केला होता. यशराजची ही ऑफर ज्युनिअर एनटीआरने स्वीकारली आहे.

‘वॉर 2’ या सिनेमात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्क्रीन शेअर करणार आहेत. या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमात प्रेक्षकांना हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. ‘वॉर’प्रमाणे ‘वॉर 2’ हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.