उद्धव ठाकरेंना होती राज ठाकरेंची अ‍ॅलर्जी, त्यामुळे भेटता येत नव्हतं, मुख्यमंत्र्यांचा खुलासा

अयोध्या : उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची अ‍ॅलर्जी होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं. मात्र आता कसलीही अडचण नाहीये, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले की, राज ठाकरे आणि आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि चांगलं काम करत आहेत. आमच्या भेटींमध्ये राजकीय चर्चा झाली नाही.

राज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असतांना मुख्यमंत्री मात्र अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत, असा आरोप विरोधकाकडून होत आहे. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मी इथून राज्याच्या मुख्य सचिवांना, विभागाच्या सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करण्याचे निर्देश दिले आहेत.