अजित पवार नॉट रिचेबलवर भाजप नेता म्हणाला, देवेंद्र फडणवीस जादूगार, काय जादू करतील, हे सांगता येत नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. अजित पवार काय करणार यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत कोणाला माहिती असेल तर देवेंद्र फडणवीस यांनाच. कारण ते जादूगार आहेत. काय जादू करतील सांगता येत नाही असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले आहे.

नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. अहमदनगर येथील कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता याबद्दल केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती असेल. ते जादूगार आहेत. काय जादू करतील, हे सांगता येत नाही.

महाविकास आघाडीत पहिल्यापासूनच बिघाडी आहे. हळूहळू ही नाराजी पुढे येईल. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर अनेक तर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह देखील लपून राहिलेला नाही. त्यातच उद्या नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.