आतापर्यंत छोट्या पदद्यावर अनेक कॅमेडी शो प्रसारित झाले. पण ‘द कपिल शर्मा शो’ ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. असंख्य चाहते कपिलच्या विनोदबुद्धीचं कायम कौतुक करत असतात. सोशल मीडियावर देखील शोचे छोटे आणि जास्त विनोदी व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ‘द कपिल शर्मा शो’मुळे विनोदवीर कपिल शर्मा याला झगमगत्या विश्वात खरी ओळख मिळाली. कपिलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कपिल गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना पोट धरुन हासवण्याचं काम करत आहे. आलेल्या थकव्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ पाहिल्यानंतर दिवसभरात आलेला तणाव कमी होतो. ‘द कपिल शर्मा शो’ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘द कपिल शो’ चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या शोचा प्रवास दोन वेगवेगळ्या वाहिन्यांवर पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी कॉमेडियन कपिल शर्मा याचे आयोजन करतो आणि त्याच्या टीमसोबत हा कार्यक्रम नवीन थीमवर चालवतो. मधल्या काळात तो हंगामी ब्रेकही घेतो. आता पुन्हा एकदा तो सुट्टीवर जाणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे. पण हा शो फक्त तात्पुरता बंद होणार आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड जूनमध्ये शूट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याचं दुसर एक कारण म्हणजे कपिल शर्माकडे पुढे आंतरराष्ट्रीय टूर लाइन-अप आहेत. त्याचं शेड्युल खूप व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यालाही विश्रांतीची गरज असल्याने जेणेकरून तो त्याच्या इतर वचनबद्धतेची पूर्तता करू शकेल. ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सीझन कधी येईल हे सध्या तरी माहीत नाही.
