मागील 24 तासांत देशभरात 11,683 कोरोनाबाधित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजची आकडेवारी जारी केली आहे. देशत सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ही 66,170 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 28 रुग्ण दगावले आहेत. देशभरात आतापर्यंत 5,31,258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सात टक्क्यांची घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ११,६९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत ४.४८ कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी २८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत ५,३१,२५८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. केरळमध्ये आज ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी ४० जणांचा मृत्यू कोरनामुळे झाला होता. रुग्ण बरे होण्याच्या आकड्यात भर पडत आहे. आतापर्यंत ४,४२,७२,२६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मृत्यूदर १.१८ टक्के झाला आहे. तर कोरोनातून बरे होण्याचा दर ९८.६७ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत देशात २२०.६६ कोटी जणांनी लसीकरण केले आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी 1,113 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या संख्येनंतर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 81,59,506 वर पोहचली आहे. तर, मृतांचा आकडा एक लाख 48 हजार 492 वर पोहचला आहे. सातारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एकजणाचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा मृत्यू दर 1.82 टक्के इतका आहे. तर, कोरोना रिकव्हरी दर हा 98.11 टक्के आहे.
