खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; दुब्रुगढ जेलमध्ये होणार रवानगी

वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल 36 दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी (21 एप्रिल) थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते.

अमृतपाल सिंगला अटक केल्याचं पंजाब पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अमृतपाल सिंगने मोगा पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचं आधी सांगितलं जात होतं. मात्र, पंजाब पोलिसांनी ट्विट करून त्याला अटक केल्याचं जाहीर केलं. त्याला मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारातून अटक केली आहे. त्याला पोलीस अमृतसरला घेऊन गेले आहेत. आता त्याला थेट आसामच्या डिब्रुगड तुरुंगात टाकण्यात येणार आहे. पंजाब पोलिसांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. अमृतपाल सिंगला पंजाबमधील मोगा येथून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस पुढील माहिजी आहे. लोकांनी शांतता राखावी. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यास मदत करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये, असं ट्विट पंजाब पोलिसांनी केलं आहे.

अमृतपाल याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई करून त्याला आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यात रवाना करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंगने पंजाबमधील मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.अमृतपालने मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, तेथून त्याला अमृतसरला नेण्यात आले, गुरुद्वारात पोहोचल्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना आपण गुरुद्वारा असल्याची माहिती दिली. अमृतपालवर शांतता भंग करणे, हिंसाचार करणे असे अनेक आरोप आहेत. सध्या आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला ताब्यात घेतले आहे. 18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तो फरार होता.