राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार पण कर्नाटकात!

अमरावती : राष्ट्रवादी आणि बहुजन वंचित आघाडी हे एकत्र येणार आहेत. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट झाली होती. याबाबत बोलताना पवार म्हणाले, कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमची भेट झाली. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाली. वंचित बहुजन आघाडी ते रडत असलेल्या जागांची यादी मला पाठवणार आहेत.

कर्नाटकात या दोन्ही पक्षांची ताकद नगण्य आहे. हे दोन्ही पक्ष लढवत असलेल्या जागांचा त्यांना तर काही फायदा होणार नाहीच पण काँग्रेसला मात्र तोटा होईल. तरी पवार कर्नाटकात काय राजकारण करताहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.