विखे पाटलांचे हनुमान, अब्दुल सत्तार म्हणाले छाती चिरून दाखविली असती माझ्या हृदयात तेच

छत्रपती संभाजीनगर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांची मैत्री सर्वांना माहीत आहे. विखे पाटील आपल्या हृदयात आहेत. हनुमानासारखा असतो तर छातीच चिरून दाखविली असती, असे सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी मेळाव्याला विखे पाटील उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार म्हणाले की, मी जर हनुमान महाराजा सारखा एखादा भक्त असतो तर छाती चिरून दाखवली असती की माझ्या हृदयामध्ये माझे परममित्र विखे पाटील आहेत.

यावेळी पत्रकारांनी विचारले की राज्यात मराठा मुख्यमंत्री करण्याची चर्चा आहे. विखे पाटील हे मुख्यमंत्री होतील का? यावर सत्तार म्हणाले राज्यात एकनाथ शिंदे हे मराठाच मुखमंत्री आहेत. त्यांनी महसूल सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी विखे पाटील यांच्यावर दिली आहे. ते या खात्यात खूप चांगले प्रयोग करत आहेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारून पत्रकारांनी त्यांना अडचणीत आणू नये.