महाराष्ट्रासह देशभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. जाणून घ्या कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. 4 मे पर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला होता. दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच जोरदार वारेही वाहतील. महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एक मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही ‘पिवळा अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून दोन मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
