आज आयपीएल मध्ये लखनौ आणि आरसीबी यांच्यात लढत

आज आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. ईकाना स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनौ संघ सध्या दुसऱ्या स्थानावर तर बंगळुरु सहाव्या स्थानावर आहे. यंदाच्य आयपीएलच्या सोळाव्या हंगाातील हा 43 वा सामना असेल. आयपीएल 2023 मधील 15 व्या सामन्यात बंगळुरुला लखनौ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बंगळुरु संघ तयार झाला आहे.

आयपीएलच्या चालू हंगामात दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात लखनौने आरसीबीचा 1 गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अशा स्थितीत गेल्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी आरसीबी मागील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला 4 विजय आणि 4 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याचवेळी, लखनौ सुपर जायंट्स संघाने खेळलेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग-11
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, यश ठाकूर, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज, डेव्हिड विली आणि हर्षल पटेल.