2019 ला खुर्ची देताना उद्धव ठाकरेंचे धर्मांतर झालंय, राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं, असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू वर अन्याय झाला नसता, हिंदूंच्या देवी-देवतांवर, उत्सवांवर रोख लागले नसते. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे असे म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष केले आहे.

जर ही मंडळी संविधानाला मानत असती तर रझा अकॅडमी व पीएफआय सारख्या संघटनांना पाठीशी घातले नसते. मुंबईचे तत्कालीन सी. पी. संजय पांडे तेव्हा उद्धव ठाकरे यांचे जावई असल्यासारखे फिरत होते. हे लोक संविधान मानतच नाही यांना शरियत कायदा पाहिजे, अशी टीका केली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसवर टीका करतानाचे भाषण ऐकवले. याचे कारण संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओत मोदींच्या भाषणाची चूक काढली आहे. यावर बाळासाहेब ठाकरे यांचा भाषणाचा दाखला देत राणेंनी राऊतांना सुनावले आहे.

तसेच काल उद्धव ठाकरे हे मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावर राणेंनी टोला लगावला आहे. मुंबई महापालिकेतील प्रशासनाने ती सर्व जागा गोमूत्रांनी धुवून घ्यावी असे ते म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत यांनी आजचा सामनाच्या अग्रलेखामध्ये अमित शाह यांच्यावरती टीका केली आहे, यावर देखील राणेंनी उत्तर दिले आहे.

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. कामगार दिनाच्या पण शुभेच्छा. विशेषत: संजय राजाराम राऊत यांना कामगार दिनाच्या विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत.असा कामगार कोणाला ही मिळू नये, अशी इच्छा मी व्यक्त करेन. मालकाशीच गद्दारी करणारे कामगार असतील तर महाराष्ट्र कधीही पुढे जाणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

येत्या एक दोन दिवसात सुधीर सुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरीला करमुक्त करावं, अशी विनंती करणार आहे.पहिल्या दिवसापासून टॅक्स फ्री करावं, म्हणून मागणी करणार आहे.केरला स्टोरी सारखाच काही दिवसात दिशा सालियन फाईल्स हा चित्रपट ही ओटीटीवर येणार आहे, असंही नितेश राणे यांनी जाहीर केलंय. खोक्या संदर्भात 13 साउंड रेकॉर्डिंग आहेत. ते टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार आहे, असा इशाराही राणे यांनी दिलाय.