एप्रिलमध्ये 62 वर्षातील सर्वाधिक पाऊस, 10 वर्षात एप्रिल महिन्यात हवामानात बदल

यंदाचा एप्रिल महिना गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक हवामान बदलाचा ठरला. राज्यात एप्रिलमध्ये गेल्या ६२ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हवामानशास्त्र विभागाने १९६१ ते २०२३ या काळातील एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्या माहितीनुसार, एप्रिल १९६२ मध्ये २३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एप्रिल १९९४ मध्ये १५.६ मिलिमीटर तर एप्रिल १९९७ मध्ये १४.९ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. एप्रिल २०१५ मध्ये राज्यात १८.४ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा एप्रिल महिन्यात ४६.७ मिलिमीटर म्हणजे आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १९६२ मध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक पावसाच्या तुलनेतही यंदाच्या एप्रिलमध्ये झालेला पाऊस दुप्पट असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान, मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी विजेचा अतिवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्युत सेवा प्रभावित होऊन उद्योगधंद्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास परिणामी अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते. विजेची मुबलक पुरवठा न झाल्यास अनेकांनी ब्लॅक आऊटसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

एकीकडे एप्रिल महिन्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली. परंतु ऊनही चांगले तापले होते. अनेक शहरांनी तापमानाची चाळीशी पार केली होती. यामुळे एप्रिल महिना गेल्या 10 वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड देखील राहिला आहे. या महिन्यात सर्वाधिक 44.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये ३७.६ अंश सेल्सियस झाली. पुणे व मुंबईचे तापमान ३५ अंशाच्या खाली होती. पुणे शहराचे तापमान ३४.४ तर मुंबईचे तापमान ३२ अंश सेल्सियस होते.