बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून कोकणातील राजकारण तापले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. तर, भाजपानेही रिफायनरी समर्थनार्थ कोकणात कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना कोकणात परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्याकरता भाजपा नेते नितेश राणे यांनीही आज जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये प्रकल्प होण्याकरता लिहिलेल्या पत्राबाबत टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता.त्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता.
एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम ते करणार आहेत. नेमकं ते इथे पेटवण्याचं काम करण्याची भाषा करत आहेत, ते पेटवा पेटवी करण्यासाठी नाही तर आपल्या घराची चूल पेटली पाहिजे याकरता ते येथे आलेत असे नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल बारसूत आलेला आहे. असे दलाल कोकणात यायला द्यायचे का? याचा कोकण वासीयांनी विचार करायला हवा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र आले होते तेथे राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले ते मोदींच्या मन की बातवर टीका करतात पण त्यांना मन की बात समजते की धन की बात समजते ते त्यांनी सांगाव. सत्तेत असताना त्यांनी ही रिफानरी बारसूमध्ये व्हावी असं समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवलं होत. त्यांचा हा विचार कोकणातील जनतेसाठी नाही तर मातोश्रीवर खोके पोहचले पाहिजे यासाठी बदलला आहे.
