अजित पवारांचा उर्मटपणा आणि शरद पवार यांनी घाबरून मागे घेतला राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याचे कारण सांगितले आहे. अजित पवार यांचा उर्मटपणा पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला असेल असे राज ठाकरे म्हणाले.

रत्नागिरी येथील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार.