कर्नाटक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 2023 च्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला असून सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे.एकीकडे काँग्रेसने बजरंग दलावर बंदी आणणार असल्याचे सांगितले त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून राजकारण चांगलं तापलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूने जोरदार प्रचार करणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात निवडणुकीच्या अनेक जाहीर सभा पाहायला मिळणार आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूमध्ये ३६ किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत . पीएम मोदींचा हा मेगा रोड शो दोन भागात विभागला गेला आहे. यापैकी एक म्हणजे 26 किमी लांबीचा रोड शो आदल्या काल 6 मे रोजी करण्यात आला आहे. त्याचवेळी, आज 7 मे रोजी दुसरा 10 किमी लांबीचा रोड शो होणार आहे. या रोड शो सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून रोड शोनंतर पंतप्रधान शिवमोग्गा आणि म्हैसूर येथे दोन जाहीर सभा घेणार आहेत.
काँग्रेस निवडणुकीच्या प्रचार हिंदू विरोधी आहे का?
भाजपच्या वतीने पंतप्रधान राजधानी बेंगळुरूमध्ये असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेलगावी आणि इतर भागात असतील. शाह येथे एकूण 4 रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस निवडणुकीच्या प्रचार हिंदू विरोधी आहे का?अशी भावना सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे अशी कुजबुज प्रचारा दरम्यान आलेल्या लोकांमध्ये होत आहे
काँग्रेसच्या वतीने, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज बेंगळुरूमध्ये असतील, जिथे ते दोन ठिकाणी कॉर्नर सभा घेणार आहेत आणि प्रियंका गांधींसोबत रोड शो सहभागी होणार आहेत. याशिवाय प्रियांका दोन रोड शो आणि दोन जाहीर सभाही करणार आहेत.
