पठाण सिनेमानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘जवान’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शाहरुखने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
