बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद देशभरात हनुमान चालिसा म्हणणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 2 मे रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, कायदा आणि संविधान पवित्र आहेत, असे आमचे मत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा बजरंग दल, पीएफआय आणि इतर संघटना जे द्वेष, शत्रुत्व पसरवतात, मग ते बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्याक असोत, ते कायदा आणि संविधानाचे उल्लंघन करू शकत नाहीत. अशा संघटनांवर कायद्यानुसार बंदी घालण्यासह निर्णायक कारवाई करू असे काँगेस ने कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे त्यानंतर हिंदू धर्माचा रक्षण करणाऱ्या संघटनेवर घालणाऱ्या काँग्रेसचा अनेक स्थरातून निषेध करण्यात आला होता.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आज देशभरातील प्रमुख मंदिरात हनुमान चालीसा म्हणणार आहे.दोन्ही संघटनांनी त्यांच्या या कृतीला हनुमंत शक्ति जागरण अभियान असं नाव दिलं आहे.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आज, मंगळवारी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे. संघटनांनी त्याला हनुमंत शक्ती जागरण अभियान असे नाव दिले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने गेल्या आठवड्यात जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यात सरकार येताच ते बजरंग दल, पीएफआयवर बंदी घातली जाईल. जात आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या सर्व संघटनांवर कडक कारवाई केली जाईल. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस ने घोषणा पत्रात बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज बंजरंग दलाने ही भूमिका घेतली आहे.