बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईमध्ये चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँचा मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते. तर काल हैद्राबाद येथे आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले.

हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जातात. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यापासून ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची झलक यात दाखवण्यात आली आहे.

आदिपुरुष सिनेमात श्रीरामांच्य भूमिकेत प्रभास, सीतामाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन, पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे असे अनेक कलाकार दमदार अवतारात दिसत आहेत. सिनेमात रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना पाहायला मिळत आहेत. शबरीने दिलेली बोरं, हनुमान रामाची अंगठी घेऊन बंदिवासात असलेल्या सीतेला भेटायला जाणं, श्रीरामाचा युद्धाप्रसंगी असलेला आक्रमक अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. विशेष गोष्ट क्रूर रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान ट्रेलरमध्ये एकदम शेवटी दिसतोय.

ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास कार्यक्रम झाला. सिनेमातील मुख्य कलाकार ट्रेलर लाँचला उपस्थित होते. भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झाल्यावर आदिपुरुष चित्रपट आता 16 जून रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. रामायणाची गाथा 3D मध्ये मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी जगभरातले फॅन्स उत्सुक आहेत. ट्रेलर तर चांगला आहेच आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार का, हे चित्र थोड्याच दिवसांमध्ये स्पष्ट होईल.