आयपीएल 2023 स्पर्धेतील 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबईला मागच्या सामन्यात मात दिली होती. तर दिल्लीने आरसीबीला मागच्या सामन्यात पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे आजच्या कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. चेन्नईचं प्लेऑपच्या दिशेने एक पाऊल पडलं आहे. तर दिल्ली सर्वच्या सर्व सामने महत्त्वाचे आहेत. दिल्लीने आजचा सामना जिंकला नाही तर स्पर्धेतून बाहेर असेल.
गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघावर जोरदार विजय मिळवला होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर विजय मिळवला होता. चेन्नईचा संघ १३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ८ गुणांसह दिल्लीचा संघ सर्वात शेवटी आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना एम ए चिंदबरम मैदानात होत आहे.
मागच्या या सामन्यात या मैदानावर मोठी धावसंख्या उभी राहिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही मोठी धावसंख्या होईल. या मैदानावर स्पिनर्सना खूप मदत मिळते. दोन्हीकडून फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरेल.आयपीएलमधील दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड बघितले तर या दोघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत.
चेन्नईने 17 आणि दिल्लीने 10 मध्ये विजय मिळवला. चेपॉक स्टेडियमवर, दिल्लीने केवळ 2 सामने जिंकले आहेत, तर 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
चेन्नई सुपर किंग्ज :महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महिश तेक्षाना, मथिश पाथीराना, तुषार देशपांडे आणि दीपक चहर.
दिल्ली कॅपिटल्स :डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, रिपल पटेल, अमन खान, अक्षर पटेल, एनरिक नॉर्थ्या, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव.
