उद्धव ठाकरेंनी दंगल घडवण्याची प्लॅनिंग करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती- भाजप नेते नितेश राणे

उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय. तर भाजपने बारसू रिफायनरी प्रकल्पालापाठिंबा दिला त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच तापले होते यावरून ठाकरे गटात आणि भाजपमध्ये कलगितूरा चांगलाच रंगलेला आहे. याचवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमूठ सभेत मोठी घोषणा करत आपण बारसूत जाणार असल्याचे सांगितले. ते 6 मे रोजी बारसूत जाणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देत आपणही तेथे जाऊ असं म्हटलं होतं.राज्याला ठाकरे-राणे वाद काही नवीन नाही तो सर्वश्रुत आहे आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांवर एवढं बोलल्यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. संजय राऊत यांनी हडतूड करून का होईना पण माझ्यावर बोलायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही असं नितेश राणे म्हणाले तसेच संजय राऊत लॅन्डमाफिया आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी घणाघात केलाय.

नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा लॅन्डमाफिया असा उल्लेख केला आहे. विक्रोळी आणि भांडूप भागात आर नावाचा जो बिल्डर आहे. त्यासोबत संजय राऊत यांची पार्टनरशिप आहे. त्याअंतर्गत जमिनी किती बळकावल्या त्याचं उत्तर संजय राऊत या लॅन्डमाफियाने त्याला द्यावं असं नितेश राणे म्हणाले आहेत.राणे पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत यांना मला विचारायचं आहे की अलिबागच्या जो प्लॉट हवा होता. म्हणून तू एका मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावामध्ये दमदाटी करून जमीन घेतली कोट्यावधीची जमीन अवघ्या 10-20 कोटींमध्ये घेतली त्यामुळे दुसऱ्याला लॅन्डमाफिया म्हणणाऱ्याने आधी स्वत:कडे बघावं असं नितेश राणे म्हणालेत.

संजय राऊत सगळीकडे बोंबलत असतो की चुकीचा गुन्हा दाखल केला. कैदीनंबर 8959 संजय राऊत यांची पण तीच इच्छा आहे की,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे मी फाडत राहावेत, असं नितेश राणे म्हणालेत.

महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी संजय राऊत सामनाचा अग्रलेख लिहितात तसेच मागच्या 9 महिन्यांपासून संजय राऊत राज्यात अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत उद्धव ठाकरे यांनी दंगली घडवण्याची प्लॅनिंग करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

अबू आझमीजी यांनी उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा ओळखून घ्यावा दक्षिण मुंबईतील फेरीवाल्यांवर हल्ले झाले उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. दंगली भडकावण्याचं काम माझं असेल, असं स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुसलमानांवर हल्ले करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तलवारीने मुसलमानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले जेणे करून हिंदू-मुसलमान दंगली भडकतील आणि त्याचा फायदा शिवसेनेला होईल. असा त्यांचा डाव होता त्याचा फायदा घेऊन पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न उद्धव ठाकरे बघत आहे हा डाव वेळीच मुस्लिम समाजाने ओळखावा.