राज्यातील सत्ता संघर्षाचा उद्या निकाल

सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) जाहीर होणार आहे. घटनापीठातील एक न्यायाधीश हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे उद्याच निकाल लागणार आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी दुसऱ्या एका खटल्या संदर्भात बोलताना याचे संकेत दिले आहेत.

एलजीबीटी खटल्या संदर्भात बोलताना उद्याचा दिवस घाई गर्दीचा आहे. घटनापीठाचे दोन निकाल द्यायचे असल्याचे चंद्रचुड यांनी सांगितले आहे.सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिका त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे.

तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या सोळा आमदारांनी त्या उपाध्यक्षच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष आहे, असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम म्हणाले.