जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. भाजपशासित राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटात खोटी माहिती दाखविणाऱ्या चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असा संताप व्यक्त केला होता.

त्यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आव्हाड यांच्यावर टीका केली. यात वादात ठाण्यातील एका हिंदू प्रेमीने आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखल पात्र (एनसी ) गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले, अगदी निर्मात्याला सार्वजनिकरित्या फाशी देण्याची मागणी त्यांनी आली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘द केरळ स्टोरी’च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. अधिकृत आकडा जो समोर आला आहे तो 3 असून त्याला 32,000 दाखवण्यात आलं. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या फाशीची दिली पाहीजे, असे आव्हाड म्हणाले होते.

इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाकडून मुलींच्या भरतीचे चित्रण करणाऱ्या सुदिप्तो सेन-दिग्दर्शनाने त्याच्या द केरला स्टोरी सिनेमाने देशभरात मोठे राजकीय वादळ उठवले आहे. या चित्रपटाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला असून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी चित्रपट घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या बल्लारी येथील रॅलीत या चित्रपटाचा उल्लेख करताना म्हटले होते की, या चित्रपटाने समाजातील दहशतवादाचे परिणाम उघड केले आहेत. असं म्हणत नरेंद्र मोदींनी द केरळ स्टोरी सिनेमाला पाठिंबा दिलाय.