महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (गुरुवारी) निकाल येणार आहे 14 फेब्रुवारी 2023 पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 16 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता यावर आता सरन्यायाधीश डी.व्हाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर शाहा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस नरसिंह यांचे पाच सदस्यीय खंडपीठ निकाल देणार आहे देशातील अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागून आहे सरकार आणि विरोधक दोघांचीही धाकधूक वाढली असून निकाल आमच्याच बाजूने येईल असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहेत.
राहुल शेवाळे दिल्लीत काल १० रोजी रात्री बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले उद्या दोन निकालांची घोषणा होणार आहे. हे ऐतिहासिक निकाल असतील. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा शेवट होईल. महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.अमेंडमेंटच्या व्यतिरिक्त नवीन प्रयोग या प्रकरणात झालाय.त्याला मान्यता मिळेल का हे निकालातून दिसेल आम्ही केलेल्या सर्व गोष्टी घटनेला धरून आहेत घटनाबाह्य कोणतीही गोष्ट केली नाहीये.
शेवाळे म्हणाले महाविकास आघाडीचे हेच नेते कोर्टाच्या विरोधात यापूर्वी बोलले आहेत.सर्वोच्च घोटाळा,दिलासा घोटाळा असे वक्तव्य केले आहेत त्यांचाच घोटाळा दिसून येतोय सुप्रीम कोर्टाचा निकाल जो पर्यंत येत नाही तो पर्यंत बोलणं योग्य नाहीत हा रडीचा डाव महाविकास आघाडी खेळतंय लोकांनी महायुतीला मतदान केलं होते पण ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली असेही राहुल शेवाळे म्हणाले आहेत.
तसेच राहुल शेवाळे बोलताना म्हणाले कि सुप्रीम कोर्ट घटनेला अनुसरून निर्णय देईल १६ आमदार अपात्र ठरणार की नाही हे उद्या कळेल मी आत्ताच बोलणार नाही दिल्लीतही अराजकता आहे प्रशासकीय पॅावर कुणाकडे असेल हे उद्या कळेल हे दोन्ही निकाल राजकारणाला दिशा देणारे असतील उद्या शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून मी कोर्टात उपस्थित राहणार आहे.तसेच ॲड नीरज कौल, हरीश साळवे यांच्याशी बैठक घेणार आहे.
