राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे.
आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे.अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे, आणि त्याच्या काही तास आधी जयंत पाटील यांना नोटीस मिळते, हा योगायोग समजायचा की आणखी काय,हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.
