सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी हे सरकार तर सेटल झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकार तर आता सेटल झालं, हा लोकशाही आणि लोकमताचा पूर्णपणे विजय आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अपात्रतेसंदर्भातील अधिकार अध्यक्षांना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकारीही अध्यक्षांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते आता त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. तुम्ही नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही.आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे ते आमदार अपात्र असण्याचं काही कारणच येत नाही. त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच या निर्णयामुळे शिंदे फडणवीस सरकारला मोठा दिलासा मानला जात आहे.
