आयपीएल मध्ये आज लीग टप्प्यातील 56 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. राजस्थान संघ या मैदानावर कोलकाताविरुद्ध नऊ सामने खेळला आहे. यापैकी कोलकाताने 6 जिंकले आहेत. त्याचवेळी राजस्थानने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला.
दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल, तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे करो या मरो च्या स्थितीत असलेले दोन्ही संघ आज मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. विजय मिळवून प्लेऑफमध्ये कोण दाखल होणार? आणि कोणाचं आव्हान संपुष्टात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत एकुण २७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड असल्याचं दिसुन आले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने २७ पैकी १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाला १२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर एक सामना अनिर्णित राहीला आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, मुरुगुन अश्विन, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुलदीप यादव
