20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आमदार बच्चू कडू यांचा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे.

आता या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. साधारण 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे कडू यांनी सांगितले. त्यानी लोकशाही ह्या वृत्त वाहिनी वर प्रतिक्रिया देताना हा दावा केला आहे.

आता सर्व अडथळे दूर झाले आहे त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे कुणाला कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्राकडे दहा जिल्ह्याचा पदभार आहे. त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे. त्यामुळे लोकांची कामे निकाली निघावे यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे तसेच मला एकनाथ शिंदे यांनी मंत्री पद देण्याच आश्वासन दिलं होतं.

एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहे ते शब्द पाळणार आहे. असेही ते या वेळी म्हणाले.तर विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाही, एकनाथ शिंदे यांनी कागदपत्री यशस्वी लढा जिंकला असेही विधान बच्चू कडू यांनी केलं तर मंत्रिमंडळ विस्तार आता खरच 20 ते 21 तारखेला होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.