पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, दिल्लीच्या घरच्या मैदानावर रंगणार सामना

आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2023 च्या 59 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. 13 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्सने या मोसमात आतापर्यंत 11 पैकी पाच सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सर्वात शेवटी दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने 11 पैकी चार सामने जिंकले तर, सात सामने गमावले आहेत.दिल्लीने चालू हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ते केवळ चारच जिंकू शकले आहेत, तर संघाने 7 सामने गमावला आहे. 10 संघांच्या गुणतालिकेत संघ 8 गुणांसह सर्वात खाली आहे.

पंजाबने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे सध्या 10 गुण आहेत. दिल्ली आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी 15-15 सामने जिंकले.

अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना खूप अनुकूल आहे. गोलंदाज चांगल्या लाईन-लेंथसह प्रभाव पाडू शकतात. फिरकीपटू येथे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, ललित यादव, अक्षर पटेल, मनीष पांडे, अमन हकीम खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद.

पंजाब किंग्स – प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंह.