सापनाथ – नागनाथ एकत्र आले तरी मोदीजींना हरवू शकणार नाहीत असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. आम आदमी पक्षाची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान सिंह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले लोकशाही वाचवण्याची भाषा करणारे सगळे लोक हे लोकशाहीला न मानणारे आहेत. लोकशाहीच्या नावावर आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा मूळ अजेंडा मोदीजींना हरवणे हा आहे.सापनाथ – नागनाथ एकत्र आले तरी मोदीजींना हरवू शकणार नाहीत .
