उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा! मागणी करायला गेले गप्पांत रंगले, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नाना पटोलेंची टिंगल

कोण सोडून जाईल याचा नेम नाही, त्यामळे उद्धव आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांची झोप उडाली आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांसोबत महाविकास आघाडीच्याच नेत्यांची टिंगल करणारा व्हिडिओ समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा आला आहे.शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, अजय चौधरी आणि रवींद्र वायकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली, असे सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना आक्रमक होण्यास सांगितले आहे. मात्र दाखवायलाच आक्रमकपणा असल्याचे नेत्यांचे वर्तन असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. ठाकरे यांचे कट्टर शिलेदार मानले जात असलेले अनिल परब यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोणाला न विचारता राजीनामा दिल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर पटोलेंची टिंगलच केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय हरित लवादातील अनिल परब यांच्या विरोधातील याचिका मागे घेतल्याने चर्चा सुरू झाली आहे. परब भाजपच्या गळाला लागले का अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच आपल्या निष्ठावानाची महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबतची कटू भावना आणि भाजप सोबतची जवळीक यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आल्याचे म्हटले जात आहे.