डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलग्नित 83 महाविद्यालयांना लागणार ताळे,अकडमीक ऑडिट मध्ये त्रुटी. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांचा समावेश आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित 83 महाविद्यालये अकॅडमीक ऑडिट अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात नो ग्रेड अर्थात नापास ठरले आहेत त्यामुळे या महाविद्यालयातील मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तपासूनच प्रवेश क्षमता स्थगित तसेच कमी करण्याचे निर्णय कुरुगुरू डॉ प्रमोद येवले निर्णय यांनी घेतला आहे.
गेल्या तीन वर्षापासून पहिल्यांदा संलग्नित अकॅडमीक ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 272 महाविद्यालयाचे अकॅडमीक ऑडिट करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यात 102 महाविद्यालयांचे ऑडिट करण्यात आले यासंदर्भात शैक्षणिक विभागाच्या वतीने सोमवारी रात्री ऑडिट संदर्भातील ग्रेड सहित यादी प्रकाशित करण्यात आल्या या यादीत 102 महाविद्यालयाचा समावेश असून महाविद्यालयांना ए,बी,सी,डी यापैकी श्रेणी प्राप्त करण्यात आली आहे.
अकॅडमीक ऑडिट झालेल्या जिल्हानिहाय महाविद्यालये पुढील प्रमाणे-बीड जिल्हा 37 ग्रेड -4, नोग्रेड-33 तर छत्रपती संभाजीनगर मध्ये 28 ग्रेट -9,नोग्रेड-19, जालना जिल्ह्यात 11 ग्रेट -2,नोग्रेड-9 , धाराशिव 26 ग्रेड -4, नोग्रेड-22, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 83 महाविद्यालये नोग्रेड श्रेणीत आहेत या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा व मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थीसंख्याही घटविण्यात येणार आहे.
आक्षेप नोंदवण्यासाठी उर्वरित 34 महाविद्यालयांच्या अंकेश्रेणाची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना प्राप्त श्रेणीबाबत काही आक्षेप असल्यास येत्या सात दिवसात ते सादर करावे त असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी कळविले आहे.
