सुषमा अंधारे प्रकरणी संजय शिरसाट यांना पोलिसांची क्लीन चिट

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा दावा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या चौकशीनंतर संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी येथे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य हे संभाजी नगर येथील असल्याचं सांगत हे प्रकरण संभाजी नगर पोलिसांकडे पाठवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली होती.

सुषमा अंधारे यांनी 3 आक्षेप घेतले होते. विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी केला होता. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की अंधारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल केले होते. विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे.

दरम्यान यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी असले कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण एखाद्या गोष्टीचे बाऊ करणे आणि बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात देखील गेल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने देखील फटकारले आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला टार्गेट करून स्वतः प्रसिद्धीत येण्याच्या घटनांना आळा बसणार आहे.