महाराष्ट्राच्या राजकारणात तीन संजय नावाच्या नेत्यांची सध्या रोज चर्चा होत असते. एक ठाकरे गटाचे नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि तर दुसरे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि तसेच संजय गायकवाड हे तिघेही आरोप-प्रत्यारोप एकमेकांवरील टीकेमुळे लोकांमध्ये मात्र चर्चात असतात. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला,संजय शिरसाट जोरदार देताना दिसतात.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट याना संजय राऊतांबद्दल विचारले तेव्हा, आता बस्स झाले, संजय राऊत यांचा भोंगा कायमचा बंद केलं नाही, तर संजय शिरसाट नाव सांगणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. मुंबईतील बाळासाहेब भवनात आपण संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार धमका करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता राऊतांविरोधात शिरसाट काय धमाका करणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना विविध प्रश्नानांना उत्तरे दिली आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुक शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आणि भाजपसोबतच लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी असे सांगितलं शिंदे गटाचे खासदार लोकसभेच्या निवडणुकी वेळी भाजपच्या चिन्हावर लढणार हा दावा केला आहे शिंदे गटाचे आमदार भाजपकडून लढतांना त्यांना पहावे लागतील. असं जयंत पाटील म्हणाले होते त्यांना संजय शिरसाटांनी जोरदार प्रतिउत्तर दिले शिरसाट म्हणाले कि स्वतः जयंत पाटील हेच भाजपमध्ये येण्यास इच्छूक होते हे काही लपून राहिलेले नाही. याबद्दल अजित पवार अधिक चांगल सांगू शकतील असा खुलासा संजय शिरसाटांनी केला आहे
एकदिवसापूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट झाली त्या भेटीकडे राजकीय दृष्टीने बघू नये, ते एकमेकांचे चांगेल मित्र आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरेंना भेटतील ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काॅंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आयुष्यात कधी जाणार नाही हे सांगितले होते. त्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे गेले, ते कुणाला खटकतं नाही. मग फडणवीस राज ठाकरेंना भेटले तर त्यात वावगं काय? असंही संजय शिरसाट बोलत होते.
