महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. तर राज्यातील 43 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. तर राज्यातील 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. याशिवाय राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क मिळाले आहेत.
राज्यातून एकूण 1577 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती आणि ही परीक्षा केवळ 533 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. माध्यमिक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 84 हजार 416 मुले आणि 73 हजार 62 मुली आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर इयत्ता 10वी मार्च-एप्रिल 2023 च्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 3.82 टक्क्यांनी अधिक लागला आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के, कोण अव्वल, कोण तळाला जाणून घ्या.
– कोकण 98. 11%
– पुणे 95.64%
– मुंबई 93.66%
– औरंगाबाद 93.23% – नाशिक 92.22%
– कोल्हापूर 96.73%
– अमरावती 93.22%
– लातूर 92.66%
– नागपूर 92.05%
नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल 92.49%, तर कोकण विभाग ठरला अव्वल 98.11%
