तुमच्या अनेक गोष्टी बाहेर काढाव्या लागतील; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली मात्र या युवतीला काही महिने उलटूनही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाचे घोंगडे भिजत आहे. मग या युतीचे पुढे काय झाले हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. आंबेडकरांनी महाविकास आघाडीबाबत एक खळबळ जनक दावा केला सध्याच्या ब्लॅकमेलिंग च्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहील असं वाटत नाही विविध कारणाने आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल यातूनच ते निवडणुकीवेळी वेगळे होतील असेही प्रकाश आंबेडकर बोलत होते.

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीने परिवर्तन सभा आयोजित केली होती या सभेला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला त्याचबरोबर कुणासोबत युती करायची किंवा कोणासोबत करायची नाही याचे उत्तर कोणाकडेही नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी ईडी कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसलाही टोला लगावला ईडी हा सर्वांचा बाप आहे या बापाने दोरी खेचायला सुरुवात केली तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते बाहेर पडायला सुरुवात करतील पण आज आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत आम्हाला शहाणपणा शिकू नका नाहीतर तुमच्या अनेक गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला अद्याप बाहेर ठेवले आम्हाला बाहेर ठेवले तरी तुमचा जो समजत आहे तो तरी तुम्ही करा असे आव्हान करत लोकसभेच्या 48 जागांची तुम्ही कसे करणार त्या जागा वाटपासाठी तरी तुम्ही एकत्र या असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले आपण कुठल्यातरी युतीत राहणार याबद्दल दुमत नाही पण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे जे येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांना सोडून सत्तेची लढाई लढू असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे आमच्या पक्षाला नियमित वेगळे मत असल्याचे प्रकर्षाने जाणवते मागे वेळी सुद्धा मी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी आम्हाला यश आले नाही त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे आम्ही उद्धव ठाकरे यांना म्हणालो महाविकास आघाडी वंचित सोबत तुमचे जमत असेल तर जमून घ्या आम्ही सोबत आहोत असे अजित पवार म्हणाले आहे.