महाराष्ट्रामध्ये सध्या औरंगजेब आणि लव जिहादच मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव जिहाद असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
अहो, राऊत आमचं सोडा तुमच्यासोबत असणाऱ्या अबू आझमीला औरंग्या प्रिय आहे. आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेले नाही. शिल्लक सेना स्वतःच किती अध:पतन करून घेणार आहे. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.दरम्यान, निलेश राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला खुलं चॅलेंज दिलं आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “माझ्या विरोधात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंदोलन करायचं असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी ते मुंब्रा शहरामध्ये म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात करून दाखवावं.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “महाविकास आघाडी हा एक प्रकारचा लव जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वतःहून लव जिहादची बळी पडलेली आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनाची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जी फरपट होत आहे तोही एक प्रकारचा लव जिहादच आहे. त्यामुळे आता शिल्लक सेनेला आसपासचं भगव्या ऐवजी हिरवं दिसायला लागलं आहे.
