मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा तू गिधाड, तुमच्यासारख्या गिधाडांना सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर आक्षेपार्ह भाषेत धमकी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील बिल्डर परमार यांच्याआत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे, असा सवाल केला आहे.

आव्हाड यांनी काल एक ट्विट करत मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम मै सब नंगे है, अशी धमकी दिली होती. यावर वाघ म्हणाल्या, म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे.

माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता, असेही त्यांनी म्हटले आहे. टक्केवारीला कंटाळून आत्महत्या केलेल्या ठाण्यातील बिल्डर परमार यांच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार असा सवाल त्यांनी केला आहे. त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू, तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव, असा इशारा त्यांनी दिला आहे.