राष्ट्रवादीमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष,पक्षात कोणतीही जबाबदारी नाही;अजित पवार नाराज झाले का..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या.अनेक नेतेमंडळींनी यावेळी नाराजी व्यक्ती केली.अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांपाठोपाठ आपणही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करत होते. याचदरम्यान एका कार्यकर्त्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा देताच अजित पवारांनी त्याच्या डोक्यावर टपली मारली होती.

आज दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये आहे. त्याशिवाय, या नेत्यांसह पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांचं नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत”, असं शरद पवारांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जाहीर केलं.

त्यावेळी अजित पवार गैरहजर का?, शरद पवार म्हणाले
दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अजितदादा गैरहजर का? असा सवालही विचारण्यात आला. त्याबाबत बोलताना शरद पवार यांनी अजितदादांची बाजू सावरून घेत म्हणाले की पत्रकार परिषदेत सगळे असतात काय? हे आमचे बाकीचे सहकारी आहेत त्यांचंही मला आश्चर्य वाटतं. कारण सहसहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षातील नेतृत्वाची फळी कधी बसत नाही.

अजित पवार नाराज आहे का?
राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवारांना कोणतीही जबाबदारी नाही शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी नो कमेंट म्हणून माध्यमांना सांगितले आहे नंतर अजित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्र नजरे समोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देईल असं अजित पवारांनी ट्विट करून म्हणाले आहे अजित पवार नाराज आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.