नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी मोठी बातमी. सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर म्हाडातून अनिल डिग्गीकर आले आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर ही लॉटरी निघेल.
सिडको सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात घरं बांधत आहे. 31 मे या दिवशीच ही लॉटरी निघणार होती, मात्र त्याचवेळी सिडकोचे एमडी डॉ. मुखर्जीं यांची बदली झाली. त्यानंतर डिग्गीकर एमडी झालेत. आता त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की लगेच लॉटरी निघेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने ही लॉटरी निघेल.
सध्या सिडकोची तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. सिडको खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात घरे बांधत आहे. ३१ मे रोजी यंदाची लॉटरी निघणार होती. मात्र तेव्हाच सिडकोचे एमडी डॉ. मुखर्जीं यांची बदली झाली आणि डिग्गीकर एमडी झालेत. त्यामुळे त्यांनी लॉटरीचा प्रस्ताव मान्य केल्यास लगेचच लॉटरी निघणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार या तत्वाने ही लॉटरी निघणार आहे.
सर्वसामान्य व्यक्तींचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न महाडा आणि सिडकोमार्फत पूर्ण होते. अनेक व्यक्ती यंदाच्या लॉटरीची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात सिडकोच्या घरांच्या किंमती काही प्रमाणात जास्त आहेत. ही किंमत काहींच्या खिशाला परवडणारी नसल्याने नागरिक याकडे पाठ फिरवतानाही दिसत आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या अनेक घरांची विक्री शिल्लक आहे. दरम्यान, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी , जुईनगर , खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली या परिसराच्या सिडकोच्या प्रकल्पातील घरांचा आगामी लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे. येथे घरे बांधण्याचे काम जोरदार सुरु आहे. तुम्ही नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपणास आतापासूनच आर्थिक नियोजनाला सुरुवात केली तर तुम्हालाही घर घेणे शक्य होणार आहे.
