महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता?

महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठीला पत्र लिहिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बद्दल नाराजीही व्यक्त केली आहे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचेही नाव आघाडीवर दिसत आहे. तसेच ओबीसी नेते म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवार,आमदार बाळासाहेब पाटील आणि सतेज पाटील हेही नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तसेच काँग्रेसच्या पक्षाच्या महिला नेत्या म्हणून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचेही नाव समोर येत आहे.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत येऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेटही यासंदर्भात घेतली होती. मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षपदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा येणार आहे हे जवळपास निश्चित झाले होते अंतिम क्षणी यावर कोणताही निर्णय झालेला नाही असे सूत्रांकडून समजले आहे काँग्रेस पक्षाने मराठा समाजाच्या मतांऐवजी ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये दिसून येत आहे सध्याच्या परिस्थितीत मतांच्या गणितापेक्षा काँग्रेसला संघटना भक्कम आणि मजबूत करण्यासाठी भर देण्याची गरज आहे हे काम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रभावीरित्या करू शकतात असेही मानले जात आहे.

महाराष्ट्र मध्ये काँग्रेस पक्षात मोठे गटबाजी दिसून येत आहे त्यात अशोकराव चव्हाण यांचा वेगळा गट तर पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा गट तर दुसरीकडे राज्यासह विदर्भामध्ये नाना पटोले यांनी स्वातंत्र गट निर्माण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे त्या नाराजीचा सूर अनेकदा समोर आला आहे काँग्रेस पक्षाला मराठा समाजाची मत घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी मराठा नेत्यांना संधी देणं गरजेचे आहे तसेच काँग्रेसने कायमच ओबीसी समाजाला डावले आहे त्यामुळे ओबीसी समाज काँग्रेस पासून कोसो दूर गेलेला आहे तसेच भाजपने महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसी नेत्यांना राजकारणामध्ये संधी देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात न्याय देण्याचे कामही भाजप पक्षाने केल्यामुळे ओबीसी समाजाचा विश्वास भाजपवर वाढल्याचे दिसून येत आहे.