‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वर्षभरात महत्त्वाचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुपटीने वाढ असो या लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये तसेच शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेताना दिसत आहे असाच एक निर्णय म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणी पात्र असलेले स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे.

शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत मंत्रालयीन बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता रेशन दुकानात जाण्याची गरज लागणार नाही, तर फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे.’शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.