औरंगजेबाचे महिमामंडन उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्पार्जन केले. औरंगजेबाचे हे महिमामंडन उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाजेबाच्या कबरीवरून जाऊन फुलं वाहिली. त्या कबरीचं आणि औरंगाजेबाचं महिमामंडण करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरेंबरोबर युतीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं समर्थन आहे का? त्यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं समर्थन करत आहे, असं वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेल्याने विचारही गहाण ठेवल्याचं वाटते.