राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

शिक्षण अध्यापन शास्त्राची पदवी व पदविका घेतलेल्या व सध्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शिक्षक भरती संदर्भातशिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच तब्बल ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर म्हणाले महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षक भरती असून त्यानंतर राज्यातील कोणत्याही शाळेत शिक्षकांची कमतरता भासणार नाही.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत बोलताना केसरकर यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.